पिलीव प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव या ठिकाणी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा माघ पौर्णिमेला सुरू होते. त्याप्रमाणे चालू वर्षीही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू होऊन सर्व धार्मिक कार्यक्रम अतिशय उत्साहात झाले असून या यात्रेसाठी यात्रा ठिकाणी श्री महालक्ष्मी देवी, श्री जोतिबा देवस्थान, श्री म्हसोबा देवस्थान, श्री सिद्धनाथ देवस्थान त्याचप्रमाणे डोंगरावरती सुद्धा दर्शनासाठी भाविकांची बहुगर्दी झाल्याचे दिसून आले. श्री महालक्ष्मी देवीची रथातून मिरवणूक अतिशय भक्तिभावाने निघाली होती. यावेळी भाविक भक्तांनी दर्शनासाठी बहु गर्दी केली होती आणि श्री महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलंचा जयघोष मोठ्या प्रमाणात निनादत होता. यात्रेमध्ये करमणुकीची त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या शेती अवजारांची तसेच शेळ्या मेंढ्या स्टेशनरी दुकाने हॉटेल्स पाळणे या सर्वांना खरेदी-विक्री चांगल्या प्रमाणे झाल्याचे समजते. या यात्रेमध्ये यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सद्गुरु श्री श्री साखर कारखाना श्रीनगर राजेवाडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांच्या वतीने सुरळीत झाल्याचे बोलले जात आहे. यात्रा कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, त्याचप्रमाणे तेथील मंदिरांचे सर्व पुजारी मानकरी यांनीही भाविक भक्तांना मोलाचे सहकार्य केल्याचे दिसून आले.

0 Comments