Ticker

6/recent/ticker-posts

रणसंग्राम मित्र परिवाराचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प 🌺


प्रेस नोट:-

🌺 रणसंग्राम मित्र परिवाराचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प 🌺


DJ मुक्त, फटाके मुक्त आणि जलप्रदूषण मुक्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार!


वेळे गावातील रणसंग्राम मित्र परिवाराच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावट कामाचा शुभारंभ वासा पूजनाने उत्साहात करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, माता-भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गणराया अवॉर्ड – भुईंज पोलीस ठाणे यांच्या वतीने सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा मान मिळविणारे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत वाई तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविणारे रणसंग्राम मित्र परिवार मंडळ यंदाही सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार आहे.


यावेळी सरपंच सौ. अर्चना गायकवाड, उपसरपंच सौ. सिंधू ढमाळ, माजी उपसरपंच सौ. उषा पवार, श्री. राहुल ननावरे, सौ. निलम नलावडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय नलावडे तसेच श्री. विजय पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


सन १९९८ पासून रणसंग्राम मित्र परिवार सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेत असून, गावाच्या विकासासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत आहे. समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून मंडळाने अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांची परंपरा जपली आहे.


दरवर्षी मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, महिला सक्षमीकरणासाठी फूड फेस्टिवल, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.


गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव असावा, या उद्देशाने रणसंग्राम मित्र परिवार पुढील पिढीला सकारात्मक आणि सामाजिक जाणीवांची नवी दिशा देण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.




Post a Comment

0 Comments