Ticker

6/recent/ticker-posts

लांडेवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रमेशभाऊ येवले. दूध भेसळ प्रकरणातील फरारी आरोपींना अटक करा :



मंचर : प्रतिनिधी सलीम इनामदार


दूध भेसळ हा छोटा गुन्हा नाही. याबाबत वेळ प्रसंगी केंद्राकडे पाठपुरावा करू. पोलिसांनी सखोल चौकशी करून १३ फरारी आरोपींना ताबडतोब अटक करावी. त्यांच्याकडून याबाबत पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी रमेशभाऊ येवले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेशभाऊ येवले यांनी केली.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील रमेशभाऊ येवले प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, उद्योजक नित्यानंद येवले, नीलेश वळसे पाटील, संजय गावडे, किरण ढोबळे, अमित काळे आदी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात झालेले दूध भेसळ प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. यासंदर्भात लवकरच अन्न व औषध प्रशासनाकडून अहवाल तयार करण्यात येणार आहे. भेसळ प्रकरणाचा अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे. या प्रकरणातील १३ आरोपी अद्यापही फरारी आहेत. त्यांना पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. आरोपींना न पकडल्यास पोलिसांना जाब विचारू, असे रमेशभाऊ येवले यांनी सांगितले. दूध भेसळ प्रकरणाची पाळमुळे खोल असून, यातील मुख्य सूत्रधाराची माहिती पुढील चार ते पाच दिवसात सांगू, मंचर येथे याबाबत केलेले आंदोलन हे त्रासलेल्या जनतेसाठी केले होते. या आंदोलनात तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील सहभागी होतील, अशी अपेक्षा होती; मात्र, ते सहभागी झाले नाही, असे रमेशभाऊ येवले यांनी सांगितले. अरुण गिरे यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी दूध भेसळखोरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments