Ticker

6/recent/ticker-posts

वनवासी उल्लेख केल्या बद्दल आदिवासी बांधवा कडून निषेध



  रुस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- 

आदिवासींना 'वनवासी" आदिवासी हा या देशाचा मुळ निवासी आहे. जल, जंगल, जमिनीचा खरा मालक आहे त्याची स्वतंत्र ओळख संस्कृती आणि इतिहास आहे व आदिवासी समाजाच्या स्वतंत्र विरांच्या बलीदानाने भारत देशाला स्वातंत्र मिळाले आहे. असे असतांना भारत सरकारचे गृहमंत्री .अमीत शहा हे आदिवासी समाजाला वनवासी संबोधने हे असंविधानीक आहे. व आदिवासी समाजाच्या अस्मीतेचा, स्वाभीमानाचा आणि संविधानीक अधिकाराचा घोर अपमान आहे. म्हणून . अमीत शहा गृहमंत्री भारत सरकार यांचा आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे व त्यांच्या वर अनुसूचित जाती जमाती कायद्यां अंतर्गत तसेच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कठोर कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील व कळंब तालुक्यातील आदिवासी समाज बांधवाच्या वतीने  राष्ट्रपती भारत सरकार नई दिल्ली यांना तहसिलदार कळंब धिरज स्थुल  यांच्या मार्फत दिलेल्या निवेदना द्वारे  करण्यात आली

वनवासी शब्द आदिवासी समाजाला दुय्यम दर्शविण्याचा प्रयत्न असुन हा शब्द संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा आहे आदिवसी हा देशाचा निवासी असतांना आदिवासी समाजाला वनवासी संबोधने हा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा आहे 

केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी भारतीय आदिवासी बंधुची माफी मांगावी अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने संपूर्ण देशात जनआंदोलन करण्यात येईल असा तिर्व इशारा आदिवासी बांधवांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे 

निवेदन देते वेळी बळवंतराव मडावी, अंकुश आत्राम , अशोकभाऊ  मंगाम , प्रशांत घोडाम ,अशोकभाऊ उमतकर , महादेवराव काळे, गजाननराव पंचबुद्धे , प्रशांत सोयाम , झानेश्वरराव ढोले ,एम एम जुमनाके 

अंकुश गाडेकर, सुनिल कुमरे इ आदिवासी  बांधव तसेच इतर प्रतिष्ठीत व्यक्ती  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments