काकडी गावचे सुपुत्र, चि. तुषार जयश्री सुनिल पा. डांगे यांची ठाणे जिल्हा पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल,दि. १९/०४/२०२६ रोजी डांगे पाटील मळा, मल्हारवाडी येथे सत्कार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी, युवानेते मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेबांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून, चि. तुषार जयश्री सुनिल पा. डांगे यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!!
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना युवानेते मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेब म्हणाले की, हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. चि. तुषार यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस सेवेत भरती झाले आहे, ही त्यांच्या कुटुंबासोबतच संपूर्ण गावासाठी गौरवाची बाब आहे.
पोलीस दलात काम करताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजसेवेची भावना जपत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, हीच अपेक्षा. त्यांच्या यशामुळे गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास आहे असे मनोगत व्यक्त करून चि.तुषार यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!!
या प्रसंगी, श्री विजय रावसाहेब डांगे, श्री प्रशांत लक्ष्मण शिंदे, श्री दत्तू सहादू गुंजाळ, श्री दत्तू श्रावण शिंदे, श्री बाबुराव अर्जुन डांगे, श्री भाऊसाहेब कोंडाजी डांगे, श्री आनंद वामन डांगे, श्री कोंडाजी चांगदेव कोल्हे, श्री बाळू संपत डांगे, श्री संपत गोपीनाथ डांगे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!!!

0 Comments