तुळक प्रतिनिधी जामनेर :
शेंदूर्णी शहरालगत मेणगाव रोड वर असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला शेकडो टन लाकूड साठा प्रशासनाने जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेणगाव रोड परिसरात अवैधरित्या लाकूड साठा ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा आढळून आला. संबंधित साठ्याबाबत आवश्यक अशा अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.जप्त करण्यात आलेल्या लाकडाची किंमत लाखोंमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत आणखी ठिकाणी तपास मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

0 Comments